नमुना १ : शुल्क कालावधीने भरण्यासाठी पत्र नमुना
रमण भल्ला
प्रथम वर्ष वाणिज्य
४२२, गुरुनानक विहार,
नवी पेठ, पुणे – ४११ ०३०
१५ नोव्हेंबर २०१६
प्रति,
प्राचार्य
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर
स्टडीज,
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
विषय
: महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क भरणेबाबत..
माननीय महोदय,
मी
रमण भल्ला, रोल नं. १ आपल्या स्वराज महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.कॉम. चा विद्यार्थी
आहे. मी सध्या बँकेतून नोटा मिळण्याच्या अडचणींमुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक शुल्क
भरू शकत नाही. त्यामुळे मी बुधवार दि. २३/११/२०१६ पर्यंत महाविद्यालयाचे शुल्क कोणत्याही
परिस्थितीमध्ये भरू भरेल. तरीही मला सध्या आयकार्डशिवाय परीक्षेला बसू द्यावे.
आपला विश्वासू
रमण भल्ला
नमुना २ : शिष्यवृत्तीचा अर्ज जमा करण्यासाठी कालावधी नमुना
इशिता भल्ला
प्रथम वर्ष वाणिज्य
४२२, गुरुनानक विहार,
नवी पेठ, पुणे – ४११ ०३०
१५ नोव्हेंबर २०१६
प्रति,
प्राचार्य
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर
स्टडीज,
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
विषय
: महाविद्यालयामध्ये शिष्यवृत्तीचा अर्ज भरण्यासाठी कालावधी मिळणेबाबत..
माननीय महोदय,
मी
इशिता रमण भल्ला, रोल नं. ४ आपल्या स्वराज महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.सी.ए.ची विद्यार्थिनी
आहे. मी नुकताच उत्पन्नाचा दाखला काढावयास दिला आहे. सदर दाखल्याचे जे टोकन मला
मिळाले आहे त्याद्वारे मी येत्या दोन दिवसात म्हणजेच शुक्रवार दि. २५/११/२०१६
पर्यंत महाविद्यालयामध्ये माझा ऑनलाईन भरलेला शिष्यवृत्तीचा दाखला सर्व
कागदपत्रासह जमा करेल. असे न केल्यास मी खुल्या प्रवर्गानुसार संपूर्ण शुल्क
भरण्यास देय राहील हे मला मान्य आहे. तरीही माझी अडचण लक्षात घेऊन मला परीक्षेस
बसण्यास अनुमती द्यावी ही नम्र विनंती.
आपली विश्वासू
इशिता भल्ला
नमुना ३ : बँकेत खाते उघडण्यासाठी बोनाफाईड प्रमाणपत्र
मिळणेबाबत
रुही भल्ला
४२२, गुरुनानक विहार,
नवी पेठ, पुणे – ४११ ०३०
१५ नोव्हेंबर २०१६
प्रति,
प्राचार्य
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर
स्टडीज,
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
विषय : बोनाफाईड प्रमाणपत्र मिळणेबाबत..
माननीय महोदय,
मी
रुही रमण भल्ला, रोल नं. ६ आपल्या स्वराज महाविद्यालयातील प्रथम वर्ष बी.बी.ए. ची विद्यार्थिनी
आहे. मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले
अर्थसहाय्य योजनेद्वारे शिष्यवृत्तीचा अर्ज भरत आहे. त्यासाठी मला माझे बचत खाते
बँक ऑफ महाराष्ट्र येथे उघडणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी माझी ओळख पटावी याकरिता
मला महाविद्यालयाकडून बोनाफाईड प्रमाणपत्र द्यावे ही नम्र विंनती.
यासाठी लागणारे शुल्क रु. २०/- महाविद्यालयाच्या
कार्यालयात भरले आहेत.
आपली विश्वासू
नमुना ४: आजारी असल्यामुळे रजा घेतल्याने वर्गशिक्षकांना
पत्र
आदि रमण भल्ला
४२२, गुरुनानक विहार,
नवी पेठ, पुणे – ४११ ०३०
२३ नोव्हेंबर २०१६
प्रति,
वर्गशिक्षका, द्वितीय वर्ष वाणिज्य,
स्वराज कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्यूटर स्टडीज
धनकवडी, पुणे – ४११ ०४३
विषय : आजारपणात रजा
घेतल्याबाबत...
माननीय महोदया,
मी
आदि रमण भल्ला, अनुक्रमांक २३, द्वितीय वर्ष वाणिज्य मध्ये शिकतो. मला दि १५
नोव्हेंबर २०१६ पासून डेंग्यू आजार झाल्याने मी महाविद्यालयात येऊ शकलो नाही.
डॉक्टरांनी मला सात दिवस विश्रांती घेण्यास सांगितली होती. तसे मी सोबत प्रमाणपत्र
जोडले आहे.
मी
माझा बुडालेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तरीही माझा रजेचा
अर्ज स्वीकार करावा ही नम्र विंनती
आपला विश्वासू
आदि रमण भल्ला